Home माझं गाव माझं गा-हाणं मेशी येथे कोव्हीड विलगिकरण कक्षाचे उदघाटन संपन्न.

मेशी येथे कोव्हीड विलगिकरण कक्षाचे उदघाटन संपन्न.

203

राजेंद्र पाटील राऊत

(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
मेशी येथे कोव्हीड विलगिकरण कक्षाचे उदघाटन संपन्न.
देवळा:- नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील मेशी येथे १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत आम्ही मेशीकर ह्या सोशल ग्रुपच्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेत कोव्हिड विलगीकरण कक्षाचे आज देवळा तहसीलदार दत्तात्रय शेजुळ आणि मेशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी स्वाती मोरे यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले.
मेशी येथे जन्म होऊन प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देखील मेशी गावीच घेतले पण नोकरी आणि व्यवसायानिमित्ताने गेल्या कित्येक वर्षांपासून बाहेरगावी नाशिक, पुणे,मुंबई अशा अनेक ठिकाणी सध्या राहत असलेले मेशीकर एकत्र येत एक सोशल मीडियावर व्हाट्सएपचा आम्ही मेशीकर हा ग्रुप बनवत आपण गावासाठी काही देणे लागतो एक तर मेशी गाव हे कोरोना हॉटस्पॉट बनले असून गावासाठी कोरोनासारख्या महामारीच्या काळात गावाला काही थोडाफार मदतीचा हात देऊ शकतो का ह्या उदात्त हेतूने आपापल्या परीने आर्थिक मदत जमा केली आणि सध्या गावात राहत असलेल्या काही होतकरू तरुणांशी संपर्क साधत कोव्हीड विलगिकरण कक्ष सुरू करण्याचे ठरविले .त्यासाठी ह्या जमा केलेल्या आर्थिक मदतीतून आज दहा बेड विकत घेऊन जवळपास पन्नास हजार रुपयांची काही औषधे देखील आणण्यात येऊन
मेशी येथे आम्ही मेशीकर सोशल ग्रुपच्या आर्थिक सहाय्यातून व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जनता विद्यालय यांच्या सहकार्याने आणि दानशूर व्यक्तीच्या वतीने मेशी व मेशी अंतर्गत वाड्या वस्त्या वर आढळणारे, लक्षणे असणाऱ्या कोरोणा बाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली .
सदर उदघाटन प्रसंगी तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांनी ह्या टीमचे समाधान व्यक्त करत तोंडभरून कौतुक करत तालुक्यात असे विलगिकरण कक्ष कुठेही नाही आणि हे खूप पुण्याचे काम करत असल्याचे गौरवोउदगार काढत त्यांनी असेच पुण्याचे काम तुमच्या हातून यापुढेही घडो अशा शुभेच्छा दिल्या.
विलगीकरण कक्षात बेडची व्यवस्था ,
महिलांसाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था , यामध्ये चोवीस तास वीज पुरवठा, फॅन कुलर,
विश्रांतीसाठी बेड आरामखुर्च्या,
पिण्याचे शुद्ध पाणी,गरम पाणी
उपलब्ध करण्यात आले असून
प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच खाजगी सेवा देणारे गावातील डॉक्टर्स यांचे मोफत मार्गदर्शन व सल्ला उपलब्धता ,रुग्णांसाठी रोज फळांचे वाटप , सर्व सुविधांबरोबरच चहा व नाश्त्याची व्यवस्था , इत्यादी सोई सुविधा देता याव्यात या दृष्टीने प्रयत्न चालू करण्यात येत आहेत.
विलगीकरण कक्षासाठी अनेकांनी आर्थिक मदत देऊ केली आहे.तसेच
घरी उपचार घेत असणा-या बाधीतांनी स्वयंस्फूर्तीने विलगिकरण कक्षात दाखल व्हावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात येत आहे. जेणे करून इतरांना बाधा होणार नाही.
सदर उदघाटन प्रसंगी तहसीलदार दत्तात्रय शेजुळ,वैद्यकीय अधिकारी स्वाती मोरे,सरपंच सुनंदा अहिरे,उपसरपंच भिका बोरसे,माजी सभापती केदा शिरसाठ, ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ शिंदे,ग्रामपंचायत सदस्य शाहू शिरसाठ, बापू जाधव,समाधान गरुड,पवन गरुड ‘शिवाजी अहिरे आदी उपस्थित होते. विलगिकरण कक्षासाठी तुषार शिरसाठ, विशाल मराठे,शरद सूर्यवंशी,दीपक सूर्यवंशी, गोकुळ सूर्यवंशी ,किशोर शेवाळे,समाधान शिरसाठ आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.

Previous articleकंदरमध्ये कोविड सेंटरच्या कामाला सुरुवात झाली अन् अनेकांनी मदतीचे हात पुढे केले       
Next articleमेशीत वयोवृध्द आजीचा अंत्यसंस्कार केला माणूसकीच्या भावनेतून कोरोना काळात एक आदर्श
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.