राजेंद्र पाटील राऊत
वडगांवात तिन दिवस जनताकर्फ्यु लागू
वडगांव : शहरातील कोरोना दुसऱ्या लाटेतील रूग्णांचा आकडा १५२ इतकी झाल्यामुळे पालिकेने तिन दिवसासाठी जनता कर्फ्यु लागू केला असल्याची माहीती लोकनियुक्त नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी सांगितले.
सद्या शहरातील अस्थापणा सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू आहे परंतु नागरिकांना या कोरोना संसर्गाचे गांभीर्य नाही सकाळी बाजारात होणाऱ्या गर्दीची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
वडगांव शहरातील कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजनेचा भाग म्हणून वडगांव शहरात १ मे २०२१ ते ३ मे २०२१ (शनिवार, रविवार व सोमवार) असे ३ दिवस जनता कर्फ्यू पुकारलेला आहे.
या दिवसात दूध विभाग (सकाळी ६ ते ९ चालू) दवाखाना व दवाखाना शी संलग्न असलेली मेडिकल (२४ तास चालू), तसेच इतर मेडिकल्स सकाळी ८ ते १० व सायंकाळी ४ ते ६ या वेळेतच सुरू राहतील तसेच भाजीपाला ,फळे विक्री ही पूर्णपणे बंद राहणार आहे. शहरातील इतर सर्वच्या सर्व दुकाने आस्थापना पूर्ण बंद राहतील. दरम्यान तिन दिवसात शहरातील सर्व वार्डामधे सोडिअम हायड्रोक्लोराइड औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करणार असल्याचेही यावेळी सांगितले . तरी नागरिकांनी या तिन दिवसांच्या जनता कर्फ्युचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी केले आहे.