Home मुंबई प्रेयसीला भेटायला कुठलं स्टिकर लावायचं साहेब! तरुणाचा पोलिसांना प्रश्न✍️

प्रेयसीला भेटायला कुठलं स्टिकर लावायचं साहेब! तरुणाचा पोलिसांना प्रश्न✍️

158

राजेंद्र पाटील राऊत

प्रेयसीला भेटायला कुठलं स्टिकर लावायचं साहेब! तरुणाचा पोलिसांना प्रश्न✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

मुंबईत कलर कोड सिस्टीम लागू झाल्यापासून मुंबईकरांकडून कलर कोडबाबत विविध प्रश्नांची टिवटिव मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर सुरू आहे. लॉकडाऊनमुळे प्रेयसीला भेटता येत नसल्याने एका तरुणाने थेट मुंबई पोलिसांना, ‘साहेब प्रेयसीची खूप आठवण येत आहे. तिला भेटण्यासाठी कुठल्या स्टिकरचा वापर करायचा’, असे ट्विट केले. पोलिसांनी त्याच्या भावनांचा आदर करत दिलेल्या सडेताेड उत्तरामुळे त्यांचे नेटिझन्सकडून कौतुक हाेत आहे.

मुंबईत वाहन तपासणीदरम्यान होणारी गर्दी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रविवारपासून खासगी वाहनांसाठी कलर कोडिंग सिस्टीम लागू केली आहे.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी लाल रंगाचे, भाजीपाल्याच्या वाहनांसाठी हिरव्या, तर इतर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांसाठी पिवळ्या रंगाचे स्टिकर बंधनकारक करण्यात आले आहेत. या कोडबाबत विविध प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी नागरिक मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलचा आधार घेत आहेत.

गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास अश्विन विनोद याचे मुंबई पोलिसांना ट्विट आले. त्यात, ‘सर प्रेयसीला भेटण्यासाठी कुठला स्टिकर लावू? तिची आठवण येतेय,’ असे विचारण्यात आले हाेते. पाेलिसांनी ट्विटद्वारे त्याला उत्तर दिले की, आम्हाला हे समजले आहे की, हे आपल्यासाठी आवश्यक आहे, परंतु दुर्दैवाने ते आमच्या अत्यावश्यक किंवा आपत्कालीन श्रेणींमध्ये येत नाही! दूर राहिल्याने हृदयातील प्रेम अधिक घट्ट होते आणि सध्या आपण स्वस्थ राहा. आमच्याकडून तुम्हाला आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी शुभेच्छा. हा फक्त एक टप्पा आहे. घरी राहा, सुरक्षित राहा.
पाेलिसांनी दिलेल्या या सडेताेड उत्तरामुळे नेटिझन्सकडून पोलिसांचे कौतुक हाेत आहे. त्यात एकाने मुंबई पोलिसांची माफी मागितली. मात्र, पोलिसांनी त्यालाही उत्तर देताना, प्रत्येक मुंबईकर आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्या भावनाही आम्ही जाणतो. त्यामुळे माफी मागण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले.

Previous articleवल्लभ हाँस्पीटलच्या आयसीयु विभागात लागली आग 🛑
Next articleदुकाने बंद वस्तरा फिरेना,मदत मिळेना अन कोरोना जाईना !! अर्थिक मदत देण्याची मागणी – नाभिक बांधवांची मागणी!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.