राजेंद्र पाटील राऊत
दुकाने बंद वस्तरा फिरेना,मदत मिळेना अन कोरोना जाईना
!! अर्थिक मदत देण्याची मागणी – नाभिक बांधवांची मागणी!!
वाखारी प्रतिनीधी दादाजी हिरे
एप्रिल महिना सरत आल्याने उन्हाळा जोर वाढायला सुरुवात झाली असून डोक्यावरील केस वाढल्याने नागरिक पुरते हैरान झाले आहेत.संचारबंदीमुळे जिल्ह्यातील सर्वच सलून बंद आहेत.अशा परिस्थितीत सलूनमधील कारागीर, चालक व मालक हे आर्थिक संकटात सापडल्याने सलूचालकांच्या व्यवसायावर कात्री पडली असून महाराष्ट्र नाभिक महामंडळाने मुख्यमंत्र्यांकडे आर्थिक मदतीसाठी साकडे घातले असल्याची माहिती दादाजी हि रे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
राज्यात 5 लाख दुकाने असून सुमारे 21 लाख कारागिर दुकाने बंद करून बसले आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागात अनेकांचे या धंद्यावर हातावर पोट आहे.ग्रामीण भागातील सलून कारागीर दिवसाला तीनशे ते चारशे रुपयांचा व्यवसाय करतात. तालुकास्तरावरील कारागीर सातशे ते आठशे रुपये आणि शहरी भागातील एक कारागीर सरासरी बाराशे ते दीड हजार रुपयांचा व्यवसाय करतात काही ठिकाणी 50 टक्के भागिदारी तर काही ठिकाणी कारागीर पगारावर काम करतात. दुकान चालकांना कारागिराच्या पगारासह दुकानाचे भाडे, वीजबिल, कर यासह विविध देणी भागवावी लागतात. त्यामुळे रोजच्या मजुरीवर पोट भरणाऱ्या सलून चालकांना आता उधारीवर धान्य मिळणे कठीण झाले आहे.
सलून चालकांसमोर स्वत:चे घर चालवताना दुकानाचे भाडे, वीज देयक, कर, कारागिरांचे वेतन अशा सर्वच बाजूने आर्थिक संकट घोंगावत आहे. त्यात संचारबंदी संपल्यानंतरही ग्राहक सलूनमध्ये येतील का? ही दुसरी समस्या सलून चालकांसमोर आहे. त्यामुळे सरकारनेच काहीतरी पर्याय काढावा. तसेच शहरी व ग्रामीण भागातील सलून व्यवसायावरील 18 टक्के जीएसटीत कपात करून 5 टक्के करावा, अशा विविध मागण्यांवर सरकारने काम करण्याची गरज असल्याचीही नाभिक संघटनेची मागणी आहे.
सलुन व्यावसायल उर्जा देण्यासाठी सरकारने संचारबंदी काळात सलून चालक व कारागीर यांना १० हजार रु अर्थीक मदत द्यावी व योग्य अंतर ठेवुन केशकर्तन करण्याची परवानगी दिली तरसलोनी व्यवसाय नागरिक यांच्या दुय्यम समस्या मिटतील
-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०
-०-०-०-०-०-०-०-०-०-०-