Home नांदेड हिप्परगा (माळ) ता.बिलोली येथे कोरोना covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर संपन्न…

हिप्परगा (माळ) ता.बिलोली येथे कोरोना covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर संपन्न…

186

राजेंद्र पाटील राऊत

हिप्परगा (माळ) ता.बिलोली येथे कोरोना covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर संपन्न…

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

ग्राम पंचायत कार्यालय हिप्परगा (माळ) येथे कोरोना पासुन गाव सुरक्षीत राहावे व त्याची लागण होऊ नये याकरिता ग्राम पंचायत कार्यालयातर्फे कोरोना प्रतिबंध लस शिबीर आयोजित करण्यात आले होते..सर्वप्रथम महात्मा ज्योतीबा फुले यांची आज जयंती असल्याने त्यांच्या प्रतिमेचे पुजन ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच तिरुपती पा. डाकोरे व डॉ.रघुनाथ क्षेत्री सरांच्या हस्ते करुन या शिबिरास सुरुवात करण्यात आली..
या शिबिरास गावातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला एका दिवसात 100 च्या वर व्यक्तींना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली.. या साठी आरोग्य विभागातर्फे चिटमोगरा उपकेंद्र अंतर्गत तज्ञ डॉक्टरांची टीम यावेळी उपस्थित होती..यामध्ये डॉ.रघुनाथ क्षेत्री सर
सुपरवाईजर एच. ए. गोविंदवाड सर, आरोग्य सेवक वाघमारे सर,आरोग्य सेविका यास्मिन शेख , आशा वर्कर उज्वला बामणे,संगीता सोंडारे
अंगणवाडी सेविका पुष्पाबाई सोंडारे,सुरेखाताई ढगे,राधाबाई सोंडारे व गावातील प्रतिष्ठित नागरिक हणमंतराव पो पा, विठ्ठलराव पा. डाकोरे, संभाजी पा. डाकोरे,किशन पा.जाधव,संभाजी पा.जाधव,मारोती पा. डाकोरे,विनोद सोंडारे, भारत पा. डाकोरे व ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच तिरुपती मारोती पा. डाकोरे, उपसरपंच संतोष दासवाड,
उपसरपंच ज्ञानेश्वर पा.जाधव,गणेश पांचाळ, बापुराव पा. डाकोरे आदी जन उपस्थित होते…

Previous articleबागलाण तालुक्यात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे बंडु काका बच्छाव बागलाण वाचवा जनतेची आर्क हाक
Next articleतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.