राजेंद्र पाटील राऊत
तत्कालीन मुख्यमंत्री देव बाबू दिल्लीत गेल्यावर परमबीर सिंग यांचे ते पत्र आले – राष्ट्रवादी काँग्रेस, आद्य शरद पवार
राजेश एन भांगे/युवा मराठा न्युज नेटवर्क
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. मात्र हे आरोप आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळले आहेत.
या संदर्भात आज शरद पवारांनी दिल्ली येथे आपल्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन यावर सविस्तर भाष्य केले आहे. सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांचाच होता, असा खळबळजनक खुलासा शरद पवारांनी केला होता.
तसेच गृहमंत्र्यांनी दर महिन्याला १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप या पत्रात केला गेला आहे, त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि मला पाठवले होते. यात पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते यात नमूद करण्यात आलेले नाहीत, देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर ते पत्र आले, असाही दावा शरद पवारांनी केला.