Home पश्चिम महाराष्ट्र कुख्यात गुंड गजा मारणे अखेर पोलिसांच्या ताब्यात 🛑

कुख्यात गुंड गजा मारणे अखेर पोलिसांच्या ताब्यात 🛑

196

राजेंद्र पाटील राऊत

🛑 कुख्यात गुंड गजा मारणे अखेर पोलिसांच्या ताब्यात 🛑
✍️ सातारा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

सातारा :⭕ पुणे येथून खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका करण्यात आल्यानंतर कारागृहाच्या दारातून जंगी मिरवणूक काढण्यात आलेली कुख्यात गुंड गजा मारणे चांगलाच चर्चेत आला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकांना अटक केली होती. मात्र आता या सर्व प्रकरणातील मुख्य आरोपी मारणे यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

जावळी तालुक्यातील मेढा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी मारणे याला अटक केली आहे.

जेलमधून निर्दोष सुटलेला गजा मारणे पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. तो महाबळेश्वर वाई परिसरात मागील काही दिवसांपासून फिरत होता. मारणे गाडीतून मेढा येथे आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापाला रचून त्याला अटक केले होते.

खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणे याची तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांवर माध्यम व सामाजिक स्तरातून टीकेची झोड उठली.

त्यानंतर आपल्याला अटक होणार हे लक्षात आल्यानंतर गजा मारणे पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. तो थेट महाबळेश्वर वाई परिसरात मागील काही दिवसांपासून फिरत होता.⭕

Previous articleदेवळा तालुक्यात कोरोणाचे चक्क एकाच दिवशी निघाले २४ पॉझिटिव्ह
Next articleदुःख ,वेदना,संकटाना तोंड देऊन संघर्षाच्या वाटेवरील वाटचाल करणारी प्रवासी श्रीमती आशाताई बच्छाव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.