Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौजे मेथी शिवारातील शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक..

मुखेड तालुक्यातील मौजे मेथी शिवारातील शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक..

183

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील मौजे मेथी शिवारातील शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मुखेड तालुक्यातील मौजे मेथी येथील गट क्रमांक 190 मधील 2 हेक्टर13 आर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला असून शेतकरी अहिल्याबाई गणेश हिवराळे, पंचफुलाबाई दत्‍तराम हिवराळे, सुशिलाबाई नीळकंठ हिवराळे यांच्या शेतात ऊस पिकाची लागवड करण्यात आली होती. या शेतात वीज वाहिनीची डीपी असून वीज वाहिनी तील तारा मुळे शॉर्टसर्किट होऊन ऊस पिकास आग लागली. सदरील घटना आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 10 वाजेच्या दरम्यान घडली आहे. ऊस जळत असून शेतकऱ्यांनी घडलेल्या घटनेची माहिती तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांना दिली असूनतहसीलदार काशिनाथ पाटील यांनी घटनेचा पंचनामा तात्काळ करण्यात येईल असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

Previous articleफुलेनगर येथे संत रोहिदास जयंती साजरी
Next articleबार्शी तालुक्यातील नदीवरील पूल बांधकाम करण्यास १३ कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.