Home माझं गाव माझं गा-हाणं यंदाच्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्राला मागणीप्रमाणे खत पुरवठा करावा

यंदाच्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्राला मागणीप्रमाणे खत पुरवठा करावा

178

राजेंद्र पाटील राऊत

यंदाच्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्राला मागणीप्रमाणे खत पुरवठा करावा
मालेगाव प्रतिनिधी सतिश घेवरे/युवा मराठा न्युज नेटवर्क
कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय खते व रसायने मंत्र्यांकडे मागणी

कृषीमंत्री श्री.भुसे आज नवी दिल्ली येथील दौऱ्यावर गेले असून त्यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री सदानंदजी गौडा साहेब यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांबाबत त्यांनी चर्चा केली.

राज्याला खरीप हंगामासाठी सुमारे 44.50 लाख मेट्रीक टन खताची आवश्यकता असून त्याचा पुरवठा केंद्राकडून केला जातो. खरीप हंगामासाठी जून आणि जुलै महिन्यात खताला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये जून ते ऑगस्ट या कालावधीत खत पुरवठा विस्कळीत झाला होता.

यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्य शासन 2 लाख मेट्रीक टन युरियाचा अतिरिक्त साठा करणार असून विविध खतांची सुमारे 44.50 लाख मेट्रीक टन खत पुरवठ्याची मागणी केंद्र शासनाकडे आज झालेल्या भेटीत करण्यात आली आहे.

ज्या महिन्यामध्ये पिकाच्या गरजेप्रमाणे खताची मागणी आहे त्याप्रमाणे वेळेवर आणि पुरेसा खत पुरवठा व्हावा, असेही श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.

Previous articleनांदेड तालुक्यातील – त्या जप्त केलेल्या रेती साठ्याचा बुधवारी लिलाव
Next article🛑 सामाजिक कार्यकर्ता अजय भोसले ह्याचे समता विचार प्रसारक संस्था व ठाणेकराच्या वतीने कॊरोना वीर म्हणून सन्मान 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.