Home नांदेड नांदेड तालुक्यातील – त्या जप्त केलेल्या रेती साठ्याचा बुधवारी लिलाव

नांदेड तालुक्यातील – त्या जप्त केलेल्या रेती साठ्याचा बुधवारी लिलाव

128
0

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड तालुक्यातील – त्या जप्त केलेल्या रेती साठ्याचा बुधवारी लिलाव

नांदेड, दि. २४ – राजेश एन भांगे

विनापरवानगी अनाधिकृत गोळा केलेला रेतीसाठा महसूल विभागाने जप्त केला आहे.
त्याची ईटीएस मोजणी करण्यात आली आहे. या रेतीसाठ्याचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली बुधवार २४ फेब्रुवारी २०२१रोजी सकाळी ११ वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे केला जाणार आहे.

सदर अवैध रेतीसाठा हा सुमारे ४२५ ब्रास असून सदर रेतीसाठा मौजे ब्राम्हणवाडा येथे उपलब्ध आहे. सदर रेतीसाठा गटनंबर निहाय असून तो पाहून तपासून घेऊन लिलावात भाग घ्यावा व अटी आणि शर्तीबाबतची माहिती गौण खनिज विभागात कार्यालयीन वेळेत पाहून घ्यावी, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here