Home नांदेड नायगाव येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती ओबीसीचे सामाजिक कार्यकर्ते पांचाळ यांच्या...

नायगाव येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती ओबीसीचे सामाजिक कार्यकर्ते पांचाळ यांच्या कार्यालयात उत्साहात संपन्न

182
0

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती ओबीसीचे सामाजिक कार्यकर्ते पांचाळ यांच्या कार्यालयात उत्साहात संपन्न

नांदेड प्रतिनिधी

नायगाव, दि.२३ – अज्ञान,अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबाबत जन जागृती निर्माण करणारे थोर समाजसेवक संत गाडगे महाराज यांची जयंती सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ यांच्या कार्यालयात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी डेबुजी फोर्स चे नांदेड जिल्हाध्यक्ष बाळू ईकळीकर, अ.भा. ओबीसी महा- संघाचे विभागीय अध्यक्ष राजेश एन भांगे, सुजलेगांव चे पोलीस पाटील निळकंठ पाटील, तसेच सक्रिय युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन फुलारी, विश्वनाथ पाटील, गजानन फुलारी, अभिषेक पांचाळ, सुभाष पांचाळ बेटकबिलेलीकर, संग्राम बेलकर, आदी बांधव जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते,उपस्थित राहून प्रतिमेला अभिवादन केले, संत गाडगे महाराज यांचे विचार आत्मसात करून आम्ही पण स्वच्छता राहण्यासाठी आमच्या परिसरात प्रयत्न करू असे संकल्प उपस्थितांनी केला.
यावेळी स्वच्छता हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे ह्या एका गुणांमुळे माणसाचे जीवन सुंदर बनते असे मत ओबीसी (सामाजिक) कार्यकर्ते पांचाळ यांनी यावेळी व्यक्त केले.
तर समाजात उच नीच व वर्ण भेद न मानता सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन आपल्या माय भूमीच्या उन्नतीसाठी आपल्या परिसरातील आरोग्यपूर्ण वातावरणाचे, व संस्कृतीचे नेहमीच जतन केले पाहिजे असे मत यावेळी बोलताना अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे विभागीय अध्यक्ष, व युवा मराठा न्यूज चॅनल, वृत्तपत्राचे नांदेड जिल्हा विशेष प्रतिनिधी राजेश भांगे व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here