Home कोल्हापूर पेट्रोल,डिझेल,गॅसच्या दरवाढी विरोधात आ. राजूबाबा आवळे यांच्या नेतृत्वात तहसिलदारांना निवेदन.

पेट्रोल,डिझेल,गॅसच्या दरवाढी विरोधात आ. राजूबाबा आवळे यांच्या नेतृत्वात तहसिलदारांना निवेदन.

220

राजेंद्र पाटील राऊत

पेट्रोल,डिझेल,गॅसच्या दरवाढी विरोधात आ. राजूबाबा आवळे यांच्या नेतृत्वात तहसिलदारांना निवेदन.

कोल्हापूर : हातकणंगले विधान सभेचे आमदार राजूबाबा आवळे यांच्या नेतृत्वाखाली
हातकणंगले तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने पेट्रोल,डिझेल,गँसच्या दरवाढीविरोधात हातकणंगले तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
देशात पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या असून त्यात दररोज वाढ होत आहे. कोरोना, लॉकडाऊनमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या जनतेवर मोदी सरकारने इंधन दरवाढीचा आघात केला आहे.
केंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी करून दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या जनतेची अशाप्रकारे लूट कदापी मान्य होणार नाही. सरकारने इंधन दरात तात्काळ कपात करावी अन्यथा जनतेच्या तीव्र संतापाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला.
यावेळी हातकणंगले तालुका अध्यक्ष भगवानराव जाधव, सुरेश नाईक, भैरवनाथ पवार, विजय गोरड, किरण माळी, सदानंद महापुरे, जावेद पाथरवट,सुरज जमादार, निवृत्ती शिंदे, कृष्णा वाठारकर आदी उपस्थित होते.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleहनुमंत पाडा येथे पाण्याचे व्हील्स चे वाटप
Next articleछत्रपतींच्या घराण्यातील जगदंब तलवार परत द्यावी, शिवदुर्ग सवंर्धन समिती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.