Home कोकण छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे किल्ले जयगड स्वच्छता मोहीम 🛑

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे किल्ले जयगड स्वच्छता मोहीम 🛑

219

राजेंद्र पाटील राऊत

🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे किल्ले जयगड स्वच्छता मोहीम 🛑
✍️ रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी:⭕ रत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी हि संस्था गेली ६ वर्षे रत्नागिरी जिल्हामध्ये सामाजिक,शैक्षणिक, कला,क्रिडा,सांस्कृतिक आणी आरोग्यविषयक शिबिरे अशा क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे.

या काळात कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधाचे पालन करुन शिवजयंती निमित्त किल्ले जयगड येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करत आहोत.
तरी या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीच्या कणा-कणात ऐतिहासिक वास्तुचे संरक्षण व संवर्धन आणि समस्त महाराष्ट्रातील सर्व रयतेच्या मनामनात हे कर्तव्य जागविणे हा आमचा इरादा आहे.
तरी या आवतान सुपारीचा मान राखून अगत्य येण्याचे करावे. हे विज्ञापना जाणिजे. बहुत काय लिहिणे…
१९ फेब्रुवारी २०२१ सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० वा.
किल्ले जयगड, रत्नागिरी, महाराष्ट्र.

सेवेचे ठायी तत्पर
श्री. सुनिल अनंत धावडे
संस्थापक अध्यक्ष
छावा प्रतिष्ठान रत्नागिरी.

भ्रमणध्वनी क्रमांक –
श्री. समीर अनंत धावडे (संघटक रत्नागिरी जिल्हा) – ९१३००८५४४१.
श्री. समीर श्रीपत गोताड (सचिव रत्नागिरी जिल्हा) – ९२८४१६७९३०. ⭕

Previous articleबागलाण पुर्व भागात वादळी वार्यासह जोरदार पाउस 
Next articleतुंबाड मध्ये पुन्हा श्री.बेंडु भागोजी कदम यांची प्रभारी सरपंच व उपसरपंच पदी बिनविरोध निवड 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.