Home नांदेड उंद्री (प.दे.) ता.मुखेड येथे ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करत पाण्याच्या टाकीच्या...

उंद्री (प.दे.) ता.मुखेड येथे ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करत पाण्याच्या टाकीच्या बांधकामाची सुरुवात..

184

राजेंद्र पाटील राऊत

उंद्री (प.दे.) ता.मुखेड येथे ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करत पाण्याच्या टाकीच्या बांधकामाची सुरुवात..
मनोज बिरादार मुखेड तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क
आज दिनांक 26 जानेवारी रोजी मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथील बहुजन ग्रामविकास पॅनल ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करत प्रभाग क्रमांक दोन मधील नवी आबादी परिसरात पाण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणात होती. ग्रामपंचायत निवडणुकीत बहुजन ग्रामविकास पॅनल च्या वतीने पॅनल विजयी झाल्यास पाण्याच्या टाकीची व्यवस्था करण्यात येईल. असे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनाची पूर्तता करत उंद्री (प.दे.) येथील छात्रवीर सेना मराठवाडा अध्यक्ष नारायण पाटील वडजे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गजानन पाटील बोडके नागोराव वादे गंगाधर वाघमारे (ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी) प्रभाकर कोतावाड यांच्यासह प्रभाग क्रमांक दोन मधील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.

Previous articleपीकविमा सरसकट व तात्काळ मंजूर करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू “प्रहार जणशक्तीचे कैलास येसगे यांनी दिला शासनाला इशारा
Next articleयुवा मराठा न्युजच्या मुंबई कार्यालयाचे आज उदघाटन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.