Home नांदेड मुखेड तालुक्यातील 73728 शेतकऱ्यांना मिळणार 23 कोटी 44 लाख रुपये अतिवृष्टीचे अनुदान..

मुखेड तालुक्यातील 73728 शेतकऱ्यांना मिळणार 23 कोटी 44 लाख रुपये अतिवृष्टीचे अनुदान..

241

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील 73728 शेतकऱ्यांना मिळणार 23 कोटी 44 लाख रुपये अतिवृष्टीचे अनुदान..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील 73728 शेतकऱ्यांना 23 कोटी 44 लाख रुपये अतिवृष्टीचे अनुदान मिळणार असून माहे जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व ढगफुटीमुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान तसेच फळ पिकाचे झालेले नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना पहिला टप्पा यापूर्वीच देण्यात आला आहे तर दुसरा टप्प्याचे अनुदान 23 कोटी 44 लाख 41 हजार 300 रुपये नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वर्ग करण्यात आले आहेत अशी माहिती मुखेड चे तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांनी आज दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी दिली आहे. मुखेड तालुक्यातील 134 गावातील 73728 शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. यात जिरायती बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी 10000 रुपये तर बहुवार्षिक फळ पिकांना हेक्‍टरी 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या कामासाठी तहसीलदार श्री काशिनाथ पाटील सर नायब तहसीलदार श्री महेश हांडे सर पेशकार गुलाब शेख व महसूल सहाय्यक नरेश धनशेट्टी आदींनी कार्यालयीन कामकाजात परिश्रम घेतले.

Previous articleहिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सोहळा संपन्न
Next articleओबीसी समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास ओबीसी महासंघाचा तीव्र आंदोलन इशारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.