Home नांदेड हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सोहळा संपन्न

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सोहळा संपन्न

140
0

राजेंद्र पाटील राऊत

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सोहळा संपन्न
मनोज बिरादार मुखेड ता. प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
हिंदुहृदयसम्राट मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शहर प्रमुख नागनाथ लोखंडे यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली.मुखेड तालुका व शहर शाखेच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली. बाळासाहेबांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन शिवसेनेचे माजी आमदार श्री सुभाषजी साबणे यांच्या हस्ते करण्यात आले.बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.मुखेड येथील किलबिल नगर मधील गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुकीत 22 गावातील शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविल्याने शिवसेनेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री संजय बेळीकर श्री वसंत संबुटवाड जिल्हा संघटक व्यंकटराव लोहबंदे तालुकाप्रमुख बालाजी पाटील कबनूरकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

Previous articleधर्माबाद व उमरी तालुक्यातील विकास योजनांसाठी माझी भावनिक कटिबद्धता ; पालकमंत्री अशोक चव्हाण
Next articleमुखेड तालुक्यातील 73728 शेतकऱ्यांना मिळणार 23 कोटी 44 लाख रुपये अतिवृष्टीचे अनुदान..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here