Home माझं गाव माझं गा-हाणं गरबडची निवडणूक वैरभाव विसरुन हसत खेळत साजरी!   

गरबडची निवडणूक वैरभाव विसरुन हसत खेळत साजरी!   

198

राजेंद्र पाटील राऊत

गरबडची निवडणूक वैरभाव विसरुन हसत खेळत साजरी!           (युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                            मालेगाव तालुक्यातील गरबड गावातील ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर झाला. त्यात 3वार्ड 3उमेदवार निवडून आले.इतर महिला उमेदवार आधीच बिनविरोध झालेल्या होत्या. त्यात वार्ड 1मधून माजी पंचायत समिती सदस्य चिंतामण भांगरे यांनी संजय सोनवणे या उमेदवाराचा पराभव केला. वार्ड 2मधून माजी सरपंच आण्णा गुमाडे यांनी गोरख नाडेकर यांचा पराभव केला. वार्ड 3मधून भिला पेढेकर यांनी वसंत भांगरेचा पराभव केला.प्रचारकाळात उमेदवारांनी सर्व तंत्र,मार्ग वापरून प्रचार केला.आर्थिक उलाढाली झाल्या.निकाल जाहीर झाल्यावर मात्र वेगळेच चित्र मतदारांना पाहायला मिळाले.या निवडणुकीत वैरभाव वाढीस लागतो पण इथे पराभूत उमेदवारांनी विजयी उमेदवारांना फुलांचे हार आणून सत्कार केला व अभिनंदन केले. असे जगावेगळे चित्र गरबड गावाच्या ग्रामपंचायत निकालाच्या वेळी दिसून आले.

Previous articleदेगलूर तालुक्यातील मौजे लींगण केरुर येथील जनशक्ती ग्राम विकास पॅनलचा दणदणीत विजय..
Next article🛑 साष्ट पिंपळगाव येथील ठिय्या आंदोलनात मुंबई मराठा क्रांती मोर्चाचा सहभाग आणि पाठिंबा 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.