Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौ. बाराहाळी येथे पतंजली योग पिठाचा 26 वा स्थापना दिवस...

मुखेड तालुक्यातील मौ. बाराहाळी येथे पतंजली योग पिठाचा 26 वा स्थापना दिवस साजरा..

191

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील मौ. बाराहाळी येथे पतंजली योग पिठाचा 26 वा स्थापना दिवस साजरा..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौ. बारा हाळी येथे पतंजली योग पिठाच्या स्थापनेला 26 वर्ष पूर्ण होत असल्याने भारत स्वाभिमान व पतंजली योग परिवार बाराहाळी च्या वतीने दीप प्रज्वलन व ध्वजारोहण करून स्थापना दिवस साजरा करण्यात आला. महाराष्ट्र संघटक श्री दत्तात्रय काळे व जिल्हा महिला प्रभारी उर्मिला ताई साजने जिल्हा प्रभारी अनिल अमृतवार यांच्या मार्गदर्शनाखाली मौ. बाराहाळी येथे सन्मुख मठ देवरू व महिला प्रभारी संध्या मठ देवरू यांनी योग अखंडित ठेवले . या कार्यक्रमाचे ध्वजारोहण श्री केशव रापतवा ड यांनी केले तर दीप प्रज्वलन सूर्यकांत बेलूरे मोहन कोंडेवाड सौ. प्रेमला पंचगट्टे यांनी केले आहे. यावेळी सौ. मनिषा पवार इज्जत शेख भीमराव राठोड संजय पवार मनोज मठपती सौ उर्मिला कंदरफळे आदी यावेळी उपस्थित होते.

Previous articleबिलोली तालुक्यातील कासराळी येथे बहिण भावावर भिंत कोसळून भावाचा मृत्यू तर बहिण गंभीर जखमी..
Next articleमुखेड तालुक्यातील मौजे नेवळी येथे शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळून खाक.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.