Home नांदेड बिलोली तालुक्यातील कासराळी येथे बहिण भावावर भिंत कोसळून भावाचा मृत्यू तर बहिण...

बिलोली तालुक्यातील कासराळी येथे बहिण भावावर भिंत कोसळून भावाचा मृत्यू तर बहिण गंभीर जखमी..

194

राजेंद्र पाटील राऊत

बिलोली तालुक्यातील कासराळी येथे बहिण भावावर भिंत कोसळून भावाचा मृत्यू तर बहिण गंभीर जखमी..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
बिलोली तालुक्यातील कासराळी येथे भिंत कोसळून घराच्या पाठीमागे खेळत असताना बाजूस असलेल्या शौचालयाची भिंत बहिण भावावर अचानक कोसळल्यामुळे यात 6 वर्ष भावाचा दुर्दैवी अंत झालातर 8वर्षाची बहीण गंभीररित्या जखमी झाली आहे ही घटना दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी घडली आहे. कासराळी येथील प्रभाग क्रमांक पाच मधील नवीन वस्तीत सुरेश चीदमलवार यांचे घर असून त्यांच्या घराच्या पाठीमागे त्यांची मुले लक्ष्मी व गायत्री ही मुले शौचालयाच्या बाजुस खेळत होती. दोघे खेळांमध्ये दंग असताना दोघांवर शेजारील घर मालकांच्या शौचालयाची एका बाजूची भिंत अचानक कोसळली. यात लक्ष्मण सुरेश चीदमलवार या बालकांच्या चेहऱ्यावर व डोक्यावर जबर मार लागल्याने दुर्दैवी अंत झाला.तर गायत्री या 8 वर्षीय बालिकेच्या पोटास व पायात जबर मार लागल्याने ती गंभीररित्या जखमी झाली आहे. तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरू आहेत.दोन्ही भावंडे कोसळलेल्या विटांच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यांना शेजाऱ्यांनी बाहेर काढले. अत्यंत गरीब कुटुंबातील भावंडांवर कोसळली भिंत मनाला चटका लावणारी आहे. या घटनेनंतर महिलांच्या आक्रोशाने नागरिकांनी या भावंडांना बाहेर काढून दवाखान्यात भरती केले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर मुलाचा दुर्दैवी अंत झाला असून मुलीवर उपचार सुरू आहेत. घटनास्थळावर अनेकांनी गर्दी केली होती. या घटनेमुळे गावावर व परिसरात शोककळा पसरली आहे.

Previous articleआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा
Next articleमुखेड तालुक्यातील मौ. बाराहाळी येथे पतंजली योग पिठाचा 26 वा स्थापना दिवस साजरा..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.