• Home
  • मुखेड तालुक्यातील मौ. बाराहाळी येथे पतंजली योग पिठाचा 26 वा स्थापना दिवस साजरा..

मुखेड तालुक्यातील मौ. बाराहाळी येथे पतंजली योग पिठाचा 26 वा स्थापना दिवस साजरा..

राजेंद्र पाटील राऊत

20210108_132621.jpg

मुखेड तालुक्यातील मौ. बाराहाळी येथे पतंजली योग पिठाचा 26 वा स्थापना दिवस साजरा..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौ. बारा हाळी येथे पतंजली योग पिठाच्या स्थापनेला 26 वर्ष पूर्ण होत असल्याने भारत स्वाभिमान व पतंजली योग परिवार बाराहाळी च्या वतीने दीप प्रज्वलन व ध्वजारोहण करून स्थापना दिवस साजरा करण्यात आला. महाराष्ट्र संघटक श्री दत्तात्रय काळे व जिल्हा महिला प्रभारी उर्मिला ताई साजने जिल्हा प्रभारी अनिल अमृतवार यांच्या मार्गदर्शनाखाली मौ. बाराहाळी येथे सन्मुख मठ देवरू व महिला प्रभारी संध्या मठ देवरू यांनी योग अखंडित ठेवले . या कार्यक्रमाचे ध्वजारोहण श्री केशव रापतवा ड यांनी केले तर दीप प्रज्वलन सूर्यकांत बेलूरे मोहन कोंडेवाड सौ. प्रेमला पंचगट्टे यांनी केले आहे. यावेळी सौ. मनिषा पवार इज्जत शेख भीमराव राठोड संजय पवार मनोज मठपती सौ उर्मिला कंदरफळे आदी यावेळी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment