Home पश्चिम महाराष्ट्र मंदीराच्या गाभाऱ्यात वानराने मारूतीरायाला दडंवत घालत आपला प्राण सोडला

मंदीराच्या गाभाऱ्यात वानराने मारूतीरायाला दडंवत घालत आपला प्राण सोडला

105
0

राजेंद्र पाटील राऊत

मंदीराच्या गाभाऱ्यात वानराने मारूतीरायाला दडंवत घालत आपला प्राण सोडला

सांगली जिल्ह्यातील गुंडेवाडी (तालुका मिरज ) गावामध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिरात शनिवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. गावातील हनुमान मंदिरात एका वानराने मारुतीरायाला दंडवत घालत आपले प्राण सोडले. शनिवारी गावातील नागरिक मंदिरात बजरंगबलीची मनोभावे आरती करत होते. त्याचवेळी एक वानर थेट मंदिरात आले आणि गाभाऱ्याच्या बाहेर दंडवत घालू लागले. दंडवत घातल्यानंतर आहे त्याच ठिकाणी वानराने आपला जीव सोडला. ही घटना मंदिरात असलेल्या नागरिकांनी मोबाईल मध्ये कैद केली. नागरिकांना देखील मंदिरात घडलेला हा प्रकार आश्चर्यकारक वाटतो आहे.
मिरज तालुक्यातल्या गुंडेवाडी गावातील हे आहे पुरातन दक्षिणमुखी हनुमान मंदिर. या मंदीरात शनिवारी सकाळी धक्कादायक घटना घडली ज्याची सध्या संपूर्ण सांगली जिल्ह्यात बरीच चर्चा आहे. माणसं जशी सहजपणे मंदिरात येऊन दर्शन घेतात अगदी तशाच पध्दतीने एका वानराने हनुमानरायाला दंडवत घालत दर्शन घेतले. समोरील मुर्ती , बाजूच्या मुर्तीचे दर्शन घेत असलेल्या या वानराचा व्हिडिओ नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केलाय. विशेष म्हणजे दंडवत घालुन झाल्यानंतर या वानराने आहे त्याच जागी प्राण सोडला. हीच घटना नागरिकांसाठी धक्कादायक आणि आश्चर्यकारक ठरलीआहे.
गावातील हे हनुमान मंदिर प्राचीन असल्याने या मंदिरात ही घटना घडल्याने अनेकजण वेगवेगळे अर्थ लावत आहेत. शनिवारी भाविक बजरंगबलीची मनोभावे पुजा करतात. त्याच शनिवारी हे वानर मंदिरात आल्याने आणि त्याने दंडवत घालून प्राण सोडल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे. वानराने प्राण सोडल्यानंतर वानराचे दर्शन घेऊन नागरिकांनी मंदिराशेजारी त्याचे अंत्यसंस्कार पार पाडले.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here