Home सामाजिक अँक्ट २०२० असा नवीन प्रस्तावित कायद्या येणार , केंद्रीय आरोग्य मंत्रालय

अँक्ट २०२० असा नवीन प्रस्तावित कायद्या येणार , केंद्रीय आरोग्य मंत्रालय

178

राजेंद्र पाटील राऊत

अँक्ट २०२० असा नवीन प्रस्तावित कायद्या येणार ,
केंद्रीय आरोग्य मंत्रालय

भारतामधे आता धूम्रपान करण्याचं, तसंच तंबाखून्य पदार्थ सेवन करण्याचं १८ वर्षांवरून २१ वर्षांवर नेलं जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने त्याबाबतच्या विधेयकाचा मसुदा तयार केला असून, ते मंजूर झाल्यावर त्याचं कायद्यात (अँक्ट ) रूपांतर होणार आहे.
सिगरेट्स आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ जाहिरातीवर बंदी आणि व्यापाराचं नियंत्रण, उत्पादन, पुरवठा आणि वितरण) सुधारणा कायदा २०२०असं या नव्या प्रस्तावित कायद्याचं(अँक्ट) नाव आहे. या कायद्याचा मसुदा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तयार केला आहे. सिगारेट्स आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आतापर्यंत १८ वर्षांवरील व्यक्तींना करता येत होती.
नव्या कायद्यात ही वयोमर्यादा वाढवून २१ वर्षांपर्यंत नेण्यात आली आहे. ‘सिगारेट्स आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ (जाहिरातीवर बंदी आणि व्यापाराचं नियंत्रण, उत्पादन, पुरवठा आणि वितरण) कायदा २००३ मध्ये सुधारणा करून हा नवा कायदा अस्तित्वात येणार आहे.
प्रस्तावित कायद्यातील तरतुदीनुसार, सिगारेट किंवा कोणताही तंबाखूजन्य पदार्थ २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना विकता येणार नाही, तसंच कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर त्र्यिज्येच्या परिसरातही ही विक्री करता येणार नाही.
कधी दिवसाला ४० सिगरेट ओढायचा, आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर
सेक्शन सातमधील प्रस्तावित बदलानुसार, सिगारेट्स आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांची विक्री ओरिजनल पॅकिंगमध्येच करावी लागेल, सुट्या पद्धतीने करता येणार नाही. तसंच, कोणीही व्यक्ती सिगारेट्स किंवा तंबाखूजन्य पदार्थ निर्धारित प्रमाणातील माल असलेल्या पॅकिंगशिवाय उत्पादित, वितरित किंवा पुरवठा करू शकत नाही.हे निकष न पाळणाऱ्यांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. याअंतर्गत पुन्हा गुन्हा झाल्यास पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि पाच लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे.सिगारेट्स आणि तंबाखूजन्य पदार्थांचे बेकायदा उत्पादन केल्यास एक वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि ५० हजारांपर्यंतचा दंड आणि दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे. बेकायदा सिगारेट्सच्या निर्मितीसाठी दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.

युवा मराठा न्यूज.

Previous articleसावित्रीबाई फुले जयंती विशेष लेख …. राजकारणातील प्रतिभा ………..
Next articleइचलकरंजीत अनधिकृत नळजोडणी केलेल्यांवर ५ ते १५ हजार रूपये दंड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.