Home नांदेड कोळी कर्मचारी महासंघाच्या वतीने मिरेवाड यांचा सत्कार

कोळी कर्मचारी महासंघाच्या वतीने मिरेवाड यांचा सत्कार

175

राजेंद्र पाटील राऊत

कोळी कर्मचारी महासंघाच्या वतीने मिरेवाड यांचा सत्कार नायगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा कवी वीरभद्र मिरेवाड यांच्या नुकताच “माती शाबुत राहावी म्हणून” या काव्यसंग्रहाला पद्यगंधा फाउंडेशनचा अहमदनगर येथील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी मिरेवाड यांना अकोल्याच्या संकेत प्रकाशनचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झाला होता. आणि कवितासंग्रहाची विशेष गौरव म्हणून भि.ग. रोहमारे कोपरगाव या संस्थेनेही ही नोंद केली आहे. त्यांच्या या साहित्यिक चळवळीला बळ देण्यासाठी कोळी कर्मचारी महासंघाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नांदेड जिल्हा कोळी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष माधवराव रेडेवाड,दिलीप जेठेवाड, अशोक जेठेवाड, कृष्णा खानापूरकर ,उपक्रमशील शिक्षिका द्वारकाताई मेघनाळे,आणि हाणंमत वानोळे यावेळी उपस्थित होते. या पुरस्काराचे रोख रक्कम व सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ.धोंडीराम वाडकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे मिरेवाड यांच्या कार्याचे अनेकजण कौतुक केले आहे.     संजय,कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज देगलूर

Previous articleलोकमत कारखान्याकडून एफआरपी जाहीर ; शेतकरी संघटना म्हणते … जादा दर द्या !
Next articleश्री वाल्मिक ऋषी मंदिरासाठी दहा लाखाचा निधी आमदार बालाजी कल्याणकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.