Home नांदेड श्री वाल्मिक ऋषी मंदिरासाठी दहा लाखाचा निधी आमदार बालाजी कल्याणकर

श्री वाल्मिक ऋषी मंदिरासाठी दहा लाखाचा निधी आमदार बालाजी कल्याणकर

172

राजेंद्र पाटील राऊत

श्री वाल्मिक ऋषी मंदिरासाठी दहा लाखाचा निधी आमदार बालाजी कल्याणकर                                                                   देगलूर,(संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                                                     नांदेड शहरातील गोकुळ नगर परिसरात वाल्मीक ऋषी चे मंदिर बांधकामासाठी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी दहा लाखाचा निधी देण्याचे आश्वासन दिले. राजश्री शाहू महाराज पुतळा यशवंत नगर (विस्तारित )भागात कै. यंकट स्वामी रामचंद्रराव पोना( मुदीराज) यांच्या स्मरणार्थ आदिवासी कोळी व मन्नेरवारलू महोत्सवाचे आयोजित कार्यक्रमात आमदार बालाजी कल्याणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापालिकेच्या महिला व बालकल्याणच्या सभापती सरिता बिरकले, महादेव कोळी समाजाचे मराठवाडा अध्यक्ष व्यंकट मुदिराज, कार्यक्रमाच्या संयोजिका तथा महाराष्ट्र राज्य कोळी समाज संघटना युवा विभागाचे अध्यक्ष किरण यशवंतराव मुदिराज, सुरेश आंबुलगेकर, पुंडलिक मोरे, रावसाहेब पपुलवाड, बळीराम कोनेरि, दत्तात्रय अन्नमवार, गंगासागर आणेवार, सोपानराव मारकवाड या सर्वांची उपस्थिती होती.

Previous articleकोळी कर्मचारी महासंघाच्या वतीने मिरेवाड यांचा सत्कार
Next articleएसटी.कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक बदल्या व सेवा स्थगितीची चौकशी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.