Home नांदेड बस चालकाचा हृदयविकाराने चालू ड्युटी मध्ये निधन(

बस चालकाचा हृदयविकाराने चालू ड्युटी मध्ये निधन(

170

राजेंद्र पाटील राऊत

बस चालकाचा हृदयविकाराने चालू ड्युटी मध्ये निधन( संजय कोंकेवार युवा मराठा न्यूज देगलूर) कर्नाटक परिवहन महामंडळाच्या एसटी बस चालकाचा काल दिनांक 12 रोजी देगलूर तालुक्यातील वन्नाळी टोल टोलनाक्याजवळ त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना लगेच देगलूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. औराद आगाराची ही बस औराद ते नांदेड जाण्यासाठी सकाळी 11 वाजता देगलूरच्या नवीन बस स्थानकावरून नांदेड कडे जाण्यासाठी निघाली असता, देगलूर पासून दहा किलोमीटर अंतरावर वन्नाळी टोलनाक्याजवळ येताच बस चालक मकबूल शेख वय 48 वर्षे त्यांच्या छातीमध्ये दुखत असल्यामुळे बस लगेच रस्त्याच्या बाजूला घेण्यात आली. प्रवाशाने त्यांना देगलूर येथील रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले. दुपारच्या नंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Previous articleशिवडी – वरळी कनेक्टर संदर्भात मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक 
Next articleव्ही.पी.एल. स्पर्धेत इलेक्ट्रॉनिक मिडियाचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर,मा.आमदार मिणचेकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.