पेठ वडगांव शहरात IPL नंतर प्रथमच VPL वडगांव प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धा आयोजीत केल्या आहेत. वडगांव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी एक वाक्य प्रसिद्ध झालं होत ते म्हणजे
” जाऊंदे गाडी नागोबावाडी ”
खरोखरच आज अक्षरशः नागोबाडीला मान्यवरांची , पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांची रिघ लागली आहे .
प्रथम बक्षीस- २५००० व चषक,
द्वितीय बक्षीस- १५००० व चषक
तृतीय बक्षीस -१००००व चषक आणि विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या वतीने सर्व संघातील मँन आँफ द मँच व लढवया खेळाडूंसाठी ३२००० रूपयांचे बक्षिसे.
या VPL स्पर्धा वडगांव शहरअंतर्गत असून याची ख्याती कोल्हापूर जिल्ह्यात पसरली आहे. अत्यंत उत्कृष्ट रित्या नियोजन बद्ध अशी स्पर्धा सूरू असुन स्पर्धेला बक्षीसांचा धुमधडाका मोठ्या प्रमाणात असुन ,
सर्वच संघातील जिगरबाज खेळाडू उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आहेत.
पेठ वडगांव शहरातील वडगांव व्यापारी असोसिएशनचे संचालक मार्गदर्शक , श्री . संतोष लडगे ( एस् .एस्. कम्युनीकेशन ) यांचेकडून सर्व सामण्यासांठी उत्कृष्ट (झेल)कँचेस साठी ५००१ रूपयांचे बक्षीस जाहीर केले .
यावेळी पेठ वडगांव व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व्यापारी बंधू यांचेकडून ” VPL ” वडगांव प्रीमियम लिग कीक्रेट स्पर्धेच्या ठिकाणी भेट देण्यात आली . अत्यंत उत्कृष्ट नियोजन व नेटके संयोजन आयोजकांनी केलेले आहे . वडगाव मध्ये व जिल्ह्यामध्ये प्रथमच होणाऱ्या या भव्य दिव्य ” VPL ” साठी संयोजक , आयोजक , संघ मालक , सर्व जिगरबाज खेळाडू सर्व आयोजक यंत्रणा यांना व्यापारी असोसिएशन पेठ वडगाव , सर्व व्यापारी सभासद बंधू , सर्व व्यापारी प्रतिनिधी यांचेकडून सर्व जिगरबाज खेळाडू व संयोजक , आयोजक यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
ज्याप्रमाणे IPL च्या थेट प्रेक्षपण टिव्ही वरती पहायला मिळते , अगदी त्याचप्रमाणे मोबाईलवर प्रत्येक संघाची थेट प्रेक्षपण पहायला मिळत असुन या स्पर्धेला हातकणंगले तालुक्यातील मान्यवरांची रिघ लागली आहे.
तसेच स्पर्धेच्या ठिकाणी वडगांव नगरपालिकेची रूग्णवाहिका देखील उपलब्ध आहे.
यावेळी उपस्थित पेठ वडगांव व्यापारी असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी , वडगांव शहरातील आजी. माजी. नगरसेवक , उपनगराध्यक्ष , नगराध्यक्ष , वडगांव पालिकेच्या मुख्याधिकारी व इतर मान्यवर मंडळी व प्रेक्षक , पत्रकार बंधू या वडगांव प्रीमियर लिग स्पर्धेच्या ठिकाणी येऊन सर्व खेळाडूंना , संयोजक , आयोजक यांना शुभेच्छा देण्यासाठी रिघ लागली आहे.
संकलन – मोहन शिंदे युवा मराठा न्यूज नेटवर्क .