Home माझं गाव माझं गा-हाणं शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले, विदारक अनुभव! मेथीला भाव म्हणून पेरली मेथी ;मात्र पदरी...

शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले, विदारक अनुभव! मेथीला भाव म्हणून पेरली मेथी ;मात्र पदरी फक्त तोटाच

195

राजेंद्र पाटील राऊत

 

शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले, विदारक अनुभव! मेथीला भाव म्हणून पेरली मेथी ;मात्र पदरी फक्त तोटाच
(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

देवळा: – महिन्यापूर्वी २५ ते ३० रुपयांना मेथीची जुडी विक्री होत असल्याने देवळा तालुक्यातील मोठ्या क्षेत्रावर मेथीचे पीक तरारलेले. मात्र सध्या मेथीला भाव नसल्याने व्यापारी वर्ग मेथीची भाजी घ्यायला टाळाटाळ करत असून, अनेक शेतकऱ्यांना या मेथीचे करावे काय, असा प्रश्न पडला आहे. याचा विदारक अनुभव वासोळचे शेतकरी रवि गिरासे यांनी घेतला.

श्री. गिरासे यांना मेथी पिकवायला सहा हजार रुपये खर्च आला. मात्र भाजी विकून त्यांच्या हातात पडले केवळ चार हजार रुपये. यातून श्री. गिरासे यांना तब्बल दोन हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

एकीकडे कांद्याची निर्यातबंदी असल्याने कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टीने कांद्याची ७० टक्के रोपे खराब झाली आहेत. त्यामुळे कांदा लागवडीसाठी ठेवलेली जमीन तशीच पडून असल्याने शेतकरी भाजीपाल्याकडे वळला आहे. पण हा प्रयोगही घाट्यात चालला असून, भाजी लिलावात बेभावात विकली जात आहे.

वासोळचे शेतकरी रवि गिरासे यांनी आपल्या शेतात पंधरा गुंठे भाजी केली होती. भाजीलागवडीपासून, बियाणे खरेदी, मजुरी, गाडीभाडेपासून विक्रीसाठी नेईपर्यंत त्यांना सहा हजार रुपये खर्च आला व भाजी विकून त्यांच्या हातात पडले केवळ चार हजार रुपये. एक ते दीड महिना कुटुंबातील सदस्यांसह काबाडकष्ट करून मोठ्या कष्टाने भाजी पिकवली. आता त्यातून चार पैसे मिळतील, या आशेपोटी भाजी विक्रीला महाराष्ट्र नेली. मात्र त्यातून त्यांना दोन हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

Previous articleविष्णू जलाशयावर आढळला “अमूर फाल्कन ” पक्षी
Next article*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.