राजेंद्र पाटील राऊत
पुणेत ओ.बी.सी.मोर्चा दरम्यान खासदार समीर भुजबळ यांना अटक
पुणे,(सिध्दांत चौधरी युवा मराठा न्युज नेटवर्क)-ओ.बी.सी.मोर्चाला पुढे जाण्यास पोलिसांकडून मज्जाव केल्याने खासदार समीर भुजबळ यांच्यासह ओ.बी.सी.बांधवानी शनिवारवाडा परिसरातील रस्त्यावर ठाण मांडत ठिय्या आंदोलन केले.आंदोलना दरम्यान समीर भुजबळ यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.त्यानंतर त्यांना फरासखाना विश्रामबाग पोलिस स्टेशन येथे नेण्यात आले.या आंदोलनात उठ ओ.बी.सी.जागा हो,समतेचा धागा हो.जय समता जय संविधान,ओ.बी.सी.हल्लाबोल अशा घोषणा देण्यात येऊन परिसर दणाणून सोडण्यात आला होता.