Home नांदेड स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या महिलांसाठी विनामुल्य अभ्यासिका सुरु

स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या महिलांसाठी विनामुल्य अभ्यासिका सुरु

123
0

राजेंद्र पाटील राऊत

स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या महिलांसाठी विनामुल्य अभ्यासिका सुरु

नांदेड, दि. ४ ; राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

जिल्ह्यातील बेरोजगार, स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू महिलासाठी विनामुल्य अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या महिला उमेदवारांनी मोफत अभ्यासिकेचा लाभ घेऊन स्वबळावर उभे राहण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र,कैलास नगर वर्कशॉप रोड,नांदेड यांच्या मार्फत कोव्हीड 19 च्या शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करुन विनामुल्य अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलीकरीता ग्रंथालय विभागामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. या कार्यालयाच्या ग्रंथालय विभागामध्ये वाचनासाठी विविध स्पर्धा परिक्षेची पुस्तके उपलब्ध असुन सर्व प्रकारची वर्तमानपत्रे वाचनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महिलांना स्वतंत्र्य स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी अभ्यासिकेत मोफत प्रवेश देणे सुरु आहे असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Previous articleविवाहितेची मोबाईलवर लाईव्ह विडीओ करून आत्महत्या
Next articleकृषि मंत्र्यांचे शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here