Home नांदेड नायगाव पांचाळ यांनी केले जागतिक दिव्यांग दिन साजरा

नायगाव पांचाळ यांनी केले जागतिक दिव्यांग दिन साजरा

148
0

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव पांचाळ यांनी केले जागतिक दिव्यांग दिन साजरा

नांदेड, दि. ३ – राजेश एन भांगे

अपंग/दिव्यांग दिन ३ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो तर सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जाहीर केला गेला.
नायगांव येथे सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी या दिवसाच्या औचित्य साधून दिव्यांग बांधवांचा सन्मान व्हावा म्हणून शहरातील दिव्यांग बांधव अशोक संभाजी वन्ने यांचा आपुलकीने पुष्पहार देऊन व मिठाई देऊन त्यांचा सत्कार व सन्मान केला आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनाची प्रशंसा केली, यावेळी सचिन फुलारी, विठ्ठल सोंनटक्के, मारोती वंगरवार, काटेकर देशमुख , शेख मैनूसाब आदी बांधव व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. दिव्यांग बांधव अशोक संभाजी वन्ने हे दोन्ही पायांनी अपंग असतानाही त्यांनी लढण्याची जिद्द कायम ठेवत गेल्या चाळीस वर्षांपासून नायगांव शहरातील दत्तनगर येथे टायर पंम्चर चे काम ते स्वतः सर्व छोटे मोठे वाहन टुव्हीलर गाडी चे टायर पंम्चर जोडण्यापासुन ते टायर खोल फिंटीग सह काम करून परिवाराचा उदरनिर्वाहासाठी हातभार लावत आहेत, अशोक संभाजी वन्ने हे बांधव दोन्ही पायांनी अपंग असतानाही व अनेकांसाठी आदर्शवत ठरणारे आहेत मनात लढण्याची ताकद जिंकण्याची जिद्द आणि स्वाभिमान असेल तर जीवन जगणे सहज सोपे होते, अशी शिकवण जणू त्यांनी अनेकांना दिली आहे, अपंगांना समाजात मानाचे स्थान मिळावे, आपण जे करू शकतो ते सर्व काही तेही करू शकतात म्हणूनच त्यांना सहानुभूतीची नाही तर आपुलकीची गरज आहे, कोणताच दिव्यांग बांधव कमकुवत नसतो त्याच्याकडे अफाट अशी उर्जा असते फक्त आपण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून त्यांना आपल्यात सामावून घेण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे, असे मत सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ यांनी व्यक्त केले,

Previous articleस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी झाडावर चढुन आत्मक्लेश आंदोलन
Next articleसमस्या तातडीने मार्गी लावाव्यात , इनाम. ची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here