Home Breaking News दिल्लीतील शेतकरी आंदोलन पाठिंब्यास वडगांव शहरात रास्ता रोको

दिल्लीतील शेतकरी आंदोलन पाठिंब्यास वडगांव शहरात रास्ता रोको

153
0

 

वडगाव वार्ताहर : वडगांव नगरपरिषद चौकात आँल इंडीया यूथ फेडरेशन व आँल इंडीया स्टुडंट फेडरेशन व किसान संघर्ष समिती हातकणंगले यांच्या वतीने रास्ता-रोको करत प्रचंड घोषणाबाजीत रस्त्यावरच चटणी भाकर खात आंदोलन करण्यात आले. दिल्ली येथे अन्याय कारक शेतकरीविरोधी कृषी कायदे मागे घेण्यासाठी सुरू असलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन पेठ वडगांव शाहरात घेण्यात आले.
हे आंदोलन पुणे बेंगलोर महामार्गावर होणार होते. परंतु पोलिसांनी दडपशाही करत कार्यकर्त्यांना परवानगी नाकारली त्यामुळे कार्यकर्त्यांनी वडगांव नगरपरिषदे समोर रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार होश मे होश मे आके बात करो, खूप बोल किसान हल्लाबोल, अन्यायकारक कृषी कायदे मागे घ्या, आवाज दो हम एक है, शेतकरी कष्टकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी नगरपालिका चौक दणाणून सोडला.
यावेळी बोलताना यूथ फेडरेशनचे राष्ट्रीय नेते गिरीश फोंडे म्हणाले,” दिल्लीतील लाखो शेतकऱ्यांचे आंदोलन नरेंद्र मोदी सरकार थंड करण्याच्या तयारीत आहे. केंद्रसरकार जाणीवपूर्वक आंदोलक शेतकरी हे फक्त पंजाब हरियाणा राज्यातील आहेत अशी अफवा पसरवत आहेत. पण देशभरात गेले दोन महिने सुरू असलेले आंदोलन आता महाराष्ट्रात व इतर राज्यांत धगधगत चालले आहे.
कार्पोरेट शेतीकरण, बाजार कमिटी व सहकार उध्वस्त करणे, शेतीमालाला हमीभाव नाकारणे, शेतकऱ्याला भांडवलदारांसाठी बळी देणे असे कट-कारस्थान कायद्याद्वारे मोदी रचत आहेत. ते मागे न घेतल्यास भारत बंद करू.
शेतकरी शिवाजी सूर्यवंशी म्हणाले,” शेतकरी हा अंगार आहे मोदी सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. कायदे मागं न घेतल्यास सरकार उलथवून टाकू.”
ए आय एस एफ राज्य सेक्रेटरी प्रशांत आंबी म्हणाले,” शेतकऱ्यांच्या या आंदोलनात शेतकरी एकटे नाहीत या देशातील शेतकऱ्यांची मुलं देखील शेती व शेतकरी वाचण्यासाठी प्राणपणाने लढतील.”
यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्याकरिता पीएसआय प्रशांत निशाणदार यांच्याकडे देण्यात आले. यावेळी रवी जाधव, जयश्री नाईक यांची भाषणे झाली. यावेळी प्रशांत आंबी, शिवाजीराव सूर्यवंशी, अशोक जाधव, विलासराव पाटील, जगन्नाथ तालुगडे, राजेंद्र महाजन, संपतराव पाटील, सुरेखा शिंदे, जयश्री नाईक, म्हासाबी पकाले, यशोदा झुळे, मंगेश कांबळे, रवींद्र जाधव, सुनील जाधव, ओंकार जाधव, आदर्श निर्मळे, राहुल दळवी, सुहास जाधव, स्नेहल शंकर, सुनील कोळी, श्रीकांत कोळी, सखुबाई पाटील उपस्थित होते.

कोल्हापूर (युवा मराठा न्यूज नेटवर्क )
मोहन शिंदे .

Previous article” शेतकऱ्यांना अशी वागणूक मिळणार असेल तर पुरस्काराचं काय करू?” ; 30 खेळाडूंची ‘ पदकवापसी ‘ ची तयारी
Next articleएसटी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून एक हजार कोटी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here