Home कोल्हापूर भारत बटालीयनच्या जवानांचे वाठार येथे विलगीकरन

भारत बटालीयनच्या जवानांचे वाठार येथे विलगीकरन

137
0

राजेंद्र पाटील राऊत

भारत बटालीयनच्या जवानांचे वाठार येथे विलगीकरन

पेठ वडगांव : भारत राखीव बटालियनचे १०५ जवान कोल्हापूर येथे आगमन झाले आहे .
पण त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे होते अशा वेळी सर्व जवानांची सोय करणं अवघड आहे हे लक्षात येताच श्री ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन च्या वतीने त्या सर्व जवानांची वाठार येथे विलगीकरण करण्याची व वसतिगृहात रहाण्याची सोय करण्यात आली आहे . प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत व अडचणीच्या वेळी श्री ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन अग्रेसर असते मग तो महापूर असो किंवा कोरोना असो प्रत्येक आपत्तीत मुळे फौंडेशन आपलं योगदान देते. म्हणून देशाच्या सीमांच रक्षण करणाऱ्या जवानांची सेवा करण्याची संधी मिळत असल्यामुळे व आपलं कर्तव्य म्हणून हे काम केले असल्याचे सांगितले, या योगदानाबद्दल भारत बटालियन कोल्हापूर चे पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक निदेशक एन एम पराडकर यांनी आभार मानले . या कमी डॉ ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन चे अध्यक्ष अनिल नानीवडेकर यांचे सहकार्य लाभले.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleकोल्हापूर विभागात इचलकरंजी आगार प्रथम स्थानी
Next articleमराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे माहाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार सतीश भाऊ चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे भव्य मेळावा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here