Home नांदेड मुखेड तालुक्यातील निराधार अपंग श्रावणबाळ लाभार्थ्यांचे मानधन त्वरित वाटप करा संभाजी ब्रिगेडची...

मुखेड तालुक्यातील निराधार अपंग श्रावणबाळ लाभार्थ्यांचे मानधन त्वरित वाटप करा संभाजी ब्रिगेडची मागणी

245

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील निराधार अपंग श्रावणबाळ लाभार्थ्यांचे मानधन त्वरित वाटप करा संभाजी ब्रिगेडची मागणी मुखेड,( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-मुखेड तालुक्यातील श्रावण बाळ निराधार अपंग लाभार्थ्यांचे मानधन त्वरित वाटप करा अशा आशयाचे निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना आज दिनांक 17 नोव्हेंबर 2020 रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले तालुक्यातील निराधार अपंग श्रावणबाळ लाभार्थ्यांचे मानधन मागील पाच ते सहा महिन्यापासून अध्याप मिळालेली नाही. त्यासाठीचे निवेदन मा. तहसीलदार साहेब यांना आज रोजी देण्यात आले. निवेदनाची दखल न घेतल्यास कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याने या निवेदनाची दखल घेत तहसील प्रशासनाने येत्या दोन ते तीन दिवसात लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात येईल असे आश्‍वासन संभाजी बिग्रेडच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील हसनाळ कर, शहराध्यक्ष सदानंद पाटील मुखेड, ज्ञानेश्वर बनबरे, विठ्ठल शिंदे, व संभाजी थोटवे लाभार्थी आदी यावेळी उपस्थित होते..

Previous articleविजबिलाच्या वसुली विरोधात राज्यभर आरपार ची लढाई, प्रा.डाँ.एन.डी.पाटील
Next articleस्वर्गीय हिंदूहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृति दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन …
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.