Home Breaking News प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

99
0

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
– जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड,दि. २७- राजेश एन भांगे

रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत सन 2020-21 या हंगामासाठी पिकविमा प्रस्ताव स्विकारणे सुरू झाले असून रब्बी ज्वारीसाठी पिक विमा भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 तर गहु बागायती, हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर 2020 ही अंतिम मुदत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात इफ्कोटोकीयो कंपनीची पुढील तीन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. या इफ्कोटोकीयो कंपनीच्यावतीने जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार व प्रसिध्दीच्या चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन या मोहिमेला सुरूवात झाली. यावेळी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी रामराव पवार, इफ्कोटोकीयोचे जिल्हा प्रतिनीधी गौतम कदम, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, कृषि विज्ञान केंद्राचे संशोधक श्री. गिरी, तंत्र अधिकारी प्रमोद गायके हे उपस्थित होते.

Previous articleमराठवाड्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
Next article🛑 संभाजीराजेंचा सरकारला इशारा….! आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here