*व-हाणेत ग्रामपंचायतीचा कारभार,*
*गोंधळात गोंधळ सावळागोंधळ!!* मालेगांव,(युवा मराठा न्युज नेटवर्क)-नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातल्या व-हाणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पत्रकार भवनच्या जागेवरुन सध्या बहुचर्चित असलेल्या व-हाणे ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षम कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत.
सध्या व-हाणे ग्रामपंचायतीच्या विकासकामांसोबतच विविध प्रकारची चौकशी सुरु आहे.सोमवार दिनांक १२आँक्टोबर २०२० रोजी व-हाणे गांवी ग्रामपंचायत दप्तराच्या चौकशीकामी चौकशीअधिकारी राजबन्शी यांनी भेट दिली असता,तेथील ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे यांनी चौकशी अधिकाऱ्यांना दप्तर उपलब्ध करुन दिले नाही.व दप्तर अर्धवट असून घरी ठेवल्याचे सांगितले,त्यामुळे पंचायत समिती मालेगांव कडून ग्रामसेविका सांळुखे यांना नोटीस बजावण्यात येऊन चार दिवसात दप्तर चौकशीकामी हजर करण्याचे नोटीशीव्दारे बजावण्यात आली असले,तरी यानिमिताने अनेक गंभीर प्रश्न यानिमिताने उपस्थित होत आहेत.ग्रामपंचायतीचे शासकीय दप्तर घरी घेऊन जाण्याचा नैतिक अधिकार ग्रामसेवकांना आहे का? त्याशिवाय अर्धवट असलेल्या दप्तरात नंतर काही अफरातफर करुन ते दप्तर पुर्ण असल्याचे दाखविले गेले तर ती जबाबदारी नेमकी कोणाची?कामात सातत्याने निष्काळजीपणा करुन ,शासकीय दप्तराच्या बाबतीत जागरुक न राहता दप्तरदिरंगाई कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या ग्रामसेविका सांळुखे यांच्यावर आता प्रशासन नेमकी काय कारवाई करते याबाबत जनतेमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.