देवळा तालुक्यात माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेला सुरुवात
(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा :- देवळा तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या दुसऱ्या फेरीस आजपासून सुरुवात करण्यात आली असून तपासणीसाठी आलेल्या पथकास सहकार्य करण्याचे आवाहन देवळा तालुका आरोग्यधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी केले आहे.
देवळा तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची प्रथम फेरी पूर्ण झाल्यानंतर या मोहिमेच्या दुसऱ्या फेरीस आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. १४ ऑक्टोबर पासून ते दि २४ ऑक्टोबर पर्यंत दुसरी फेरी तालुक्यात राबविण्यात येणार आहे.
याकरिता तालुका प्रशासनाने ८७ पथकांची नेमणूक केली असून यामध्ये आरोग्य कर्मचारी , आशासेविका, स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली आहे, सदर कर्मचारी हे घरोघरी जाऊन प्रत्येक घरातील व्यक्तींची तपासणी करणार असून त्यामध्ये प्रत्येकाचे शरीराचे तापमान मोजणे, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणे तसेच मधुमेह,रक्तदाब हृदयरोग , दमा, कॅन्सर, श्वसनाचे आजार असणाऱ्या रुग्णांची देखील नोंद घेतली जाणार आहे.
तालुक्यातील जनतेने सदर पथक आपल्या घरी आले असता त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन तालुका आरोग्यधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी केले आहे.