Home Breaking News *प्राथमिक शिक्षक श्री. हरेराम गायकवाड व सौ सुमन गायकवाड या गायकवाड दाम्पत्याचा...

*प्राथमिक शिक्षक श्री. हरेराम गायकवाड व सौ सुमन गायकवाड या गायकवाड दाम्पत्याचा अनोखा शैक्षणिक उपक्रम

115
0

*प्राथमिक शिक्षक श्री. हरेराम गायकवाड व सौ सुमन गायकवाड या गायकवाड दाम्पत्याचा अनोखा शैक्षणिक उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना पोहचवतात स्पर्धा परीक्षा पुस्तकं* *(पांडुरंग गायकवाड युवा मराठा न्युज सुरगाणा )
जिल्हा परिषद शाळा सराड उच्च प्राथमिक शिक्षक श्री. हरेराम गायकवाड व त्यांच्या पत्नी सौ सुमन गायकवाड (कृषी सहाय्यक बोरगाव )या दाम्पत्यानं कोरोना सारख्या महामारीच्या काळात पंचायत समिती सुरगाणा व जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभाग यांच्या अंतर्गत कोरोना काळात ‘शाळा बंद पण शिक्षण चालू’ या उपक्रमांतर्गत ‘डोनेट अ बुक ‘ हा उपक्रम राबवून जि. प. शाळा राहुडे, जि. प. शाळा घोडांबे,जि. प केंद्र शाळा घागबारी या शाळेतील विद्यार्थ्यांना तशेच जे विद्यार्थी नवोदय परीक्षेत भाग घेतात अशा गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकं व लेखन साहित्य स्व -खर्चातून व स्वतः घरी जाऊन वाटप करण्यात आले आहे. समाजसेवेचा एक नवीन आदर्श लोकांसमोर ठेवला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून व्हाट्सअप कॉल, पालक भेटी, ओट्यावरील शाळा यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नी सौ. सुमन गायकवाड व पंचायत समिती सुरगाणा गटविकास अधिकारी मा. श्री. साहेब, शिक्षण अधिकारी मा. श्री. संजय कुसाळकर साहेब, शिक्षण वि. अधिकारी भाऊसाहेब सरक साहेब, श्रीम. मंदोदरी पाटील मॅडम, केंद्रप्रमुख मा. श्री. उत्तमराव जगताप साहेब,श्री केवळचौधरी साहेब, (के.प्र.बोरगाव )आदिवासी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, येवला शिक्षण पतसंस्था, मित्रपरिवार ‘बाबा ग्रुप ‘सराड,जि. प. शाळा सराड शिक्षक श्री. हाडस सर,श्री. बागुल सर, श्री.पवार सर, श्री. पालवा सर, व मुख्याध्यापक झिरवाळ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Previous article*रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना* *लाभ घेण्याचे आवाहन*
Next articleदेवळा तालुक्यात माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेला सुरुवात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here