Home Breaking News *महिला अत्याचार रोखण्यासाठी केंद्राची नवी नियमावली*

*महिला अत्याचार रोखण्यासाठी केंद्राची नवी नियमावली*

174

*महिला अत्याचार रोखण्यासाठी केंद्राची नवी नियमावली*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)*

 

देशात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महिला अत्याचार रोखण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता महिलांवरील अत्याचाराचा एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केल्यास पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच महिला अत्याचाराच्या प्रकरणात हलगर्जीपणा केल्यावरही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची तरतूद या नव्या नियमावलीत करण्यात आली आहे. त्याशिवाय बलात्काराचा तपास दोन महिन्यात पूर्ण करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांवरील अन्यायाला वाचा फूटण्यास मदत होणार आहे.
हाथरस बलात्कार आणि हत्याप्रकरणात पोलिसांकडून काही उणीवा राहिल्या होत्या. त्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नव्या नियमावलीत कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. महिला अत्याचाराच्या प्रकरणात एफआरआय नोंदवणे बंधनकारक आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्याकडे लक्ष द्यावे. एफआयआर दाखल करण्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेशच केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

Previous article*भरमसाठ व्याजाची रक्कम देण्यास नकार दिल्याने तरूणावर खूनी हल्ला*
Next articleपरळी शहराच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न विविध विकास योजनेच्या माध्यमातून साकार करणार ; पालकमंत्री धनंजय मुंडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.