*इचलकरंजी मधे दुकानात घुसला मोठा ट्रक*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी शहरात सांगली रोडवरील फाँर्चून प्लाझा जवळ रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटून ब्युटी पार्लर शेजारच्या गुरूकृपा इलेक्ट्रॉनिक दुकानात घुसल्याने मोठ्या प्रमाणात दुकानाचे नुकसान झाले आहे.
दुकान बंद असल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही
अचानक झालेल्या प्रकारामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली.
रस्त्यावरून येत असतानाच या मोठया ट्रकने एका दुचाकी स्वाराला देखिल उडवल्याने दुचाकीचा चक्काचुरा झाला आहे. दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आला आहे.
सांगली इचलकरंजी रोड वरती मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते , अचानक मोठा आवाज झाल्याने
घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती . नागरिकांनी ट्रकचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले , घटनास्थळी पोलीसांनी घडलेल्या प्रकारचा पंचनामा करून पुढील तपास करत आहेत.




