Home Breaking News मराठा समाजाची समाज जागृती दुसरी मोहीम चावरे गावांत

मराठा समाजाची समाज जागृती दुसरी मोहीम चावरे गावांत

205

मराठा समाजाची समाज जागृती दुसरी मोहीम चावरे गावांत

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. राज्यभर आरक्षणा विरोधात मराठा समाजाचा एल्गार पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव व परिसरातील ३१ गावांमध्ये मराठा समाज जागृती मोहीम राबवली जात आहे .
तसेच दुसरी मोहीम चावरे गावातील हनुमान मंदिर येथे करण्यात आली यावेळी चावरे गावातील मराठा युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होता यावेळी पेठ वडगांवचे डॉक्टर अभयसिंह यादव यांनी आपल्या मराठा समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात आपण सर्वांनी भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन मराठा आरक्षण मिळविण्यासाठी मोठा लढा देण्याची गरज आहे. व छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने गनिमीकावा केला ,
त्याच पद्धतीने आपल्याला आरक्षण मिळवण्याकरता मोठ्या प्रमाणात गणीमिकावाच करावा लागेल असे यावेळी म्हणाले ,
तसेच आळते गावाहुन आलेले मराठा समाज अभ्यासक पुंडलिक बिरंजे , आणि सावर्डे चे हनुमंत पाटील यांनी उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले तसेच हनुमान मंदिरात
“एक मराठा लाख मराठा”
” छत्रपती शिवाजी महाराज की जय” “आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे ”
अशा घोषणाही देण्यात आल्या तसेच वडगांवचे विजयसिंह शिंदे यांनी चावरे गावातील उपस्थित मराठा युवकांचे आभार मानले आणि आज मराठा समाजाची समाज जागृती तीसरी मोहीम वाठार येथे आयोजित होणार असल्याची माहिती दिली.
याप्रसंगी वडगांव व परिसरातील युवक चावरे गावातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

Previous article🛑 NEET 2020 परीक्षेची उत्तरतालिका जाहीर 🛑
Next article*** कोरोना महामारीच्या काळात एक अनोखा उपक्रम***
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.