*पुण्श्लोक अहिल्यादेवीच्या चोंडीतल्या पुलावरुन पाणी*
अहमदनगर,(प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- गेल्या दोन दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यात संततधार पावसाने थैमान घातलेले असून,शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे.
त्याबरोबरच जिल्ह्यातील रस्त्याची या पावसामुळे भयानक दुरावस्था झालेली आहे,तर या संततधारेच्या मुसळधार पावसामुळे विविध आजार उदभवण्याची मोठीच शक्यता निर्माण झालेली आहे,त्याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभुमीत श्रीक्षेत्र चोंडी ता.जामखेड येथे सीनामाई नदीपात्र दुथडी भरुन वाहत असल्यामुळे पुलावरुन पाणी ओसांडून वाहत असल्याचे दृश्य चोंडीवासियांना यावर्षी बघावयास मिळत आहे.