कांदा उत्पादकांचे उमराणेत आंदोलन
(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
देवळा:- केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याच्या निषेधार्थ उमराणे ता. देवळा येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर मुंबई आग्रा महामार्गावर संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सुमारे अर्धा तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.त्यानंतर मंडळअधिकारी पाटील व देवळा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांना कांदयावरील निर्यातबन्दी तात्काळ उठविन्यात यावी या आशयाचे निवेदन देऊन आन्दोलन मागे घेण्यात आले.
त्यानंतर बांगलादेश सिमेवर व इतर ठिकाणी असलेला व्यापारी बांधवांचा माल जोपर्यंत विकला जात नाही तोपर्यंत कांदा लीलाव सुरु न करण्याचा पावित्रा कांदा व्यापा-यांनी घेतल्याने शेतकऱ्यांनी विक्रिस आणलेल्या मालाचे काय करायचे असा प्रश्न पडल्याने त्यावर बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे यांनी प्रसिद्ध कांदा व्यापारी सुनिल दत्तू देवरे व इतर व्यापारी बांधवांशी चर्चा करून सकाळी ११ वाजता लीलाव पूर्ववत सुरु करण्यात आल्यानंतर कालच्या दरापेक्षा किमान ८०० रुपये कमी दराने म्हणजेच जास्तीत जास्त दोन हजार चारशे पंचवीस रुपये दराने कांदा विकला गेला.
यावेळी जाणता राजा मित्रमंडळाचे नंदन देवरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ,तुषार शिरसाठ, महेंद्र बोरसे,समाधान गरुड यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




