*कळवणला कांदा उत्पादकांचे आंदोलन*
कळवण,(बाळासाहेब निकम तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- केंद्र शासनाने लागू केलेली कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी या मागणीसाठी आज कळवण तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यानी आंदोलन केले.
यावेळी कळवणचे तहसिलदार आर एम गांगुर्ड यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात देविदास पवार,बाळासाहेब शेवाळे,दादाभाऊ जाधव,रविंद्रबाबा देवरे,धनंजय पवार,राजुदादा व तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.