आशाताई बच्छाव
अमरावती रेल्वे पूल: १७ कोटीच्या निधीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी: आमदार रवी राणा चा दावा, आमदार खोडके यांच्या लक्षवेधीवर उद्या चर्चा. दैनिक युवा मराठा पी एन देशमुख.जि.प्र. अमरावती. अमरावती शहरातील राजकमल आणि जस्तंभ चौकातून रेल्वे टेशन व हमालपुऱ्याला जोडणारा जुने रेल्वे उड्डाणपूल २४ ऑगस्ट पासून वाहतुकीसाठी बंद आहे या पुलाच्या पुनर्निर्मानासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी १७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले दुसरीकडे याच मुद्द्यावर आमदार संजय खोडके यांनी लक्षवेधी सूचना मांडली असून, त्यावर आगामी शनिवारी १३ डिसेंबर रोजी चर्चा होणार आहे बडनेरा चे आमदार रवी राणा यांनी या धोकादायक पुदाच्या पुनर्निर्मिनसाठी ५० कोटी रुपयाची मागणी केली होती त्यापैकी १७ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले विधिमंडळाच्या नागपुर येथील अधिवेशनात त्यांनी हा प्रश्न उपस्थित करत उर्वरित रक्कम तातडीने मंजूर करण्याची मागणी केली विधान परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) संजय खोडके यांनी याच मुद्द्यावर लक्षवेधी सूचना मांडली आहे ही लक्षवेधी सूचना आगामी शनिवारी १३ डिसेंबर रोजी चर्चेला येणार असल्याची माहिती त्यांनी दिली उड्डाणपूल बंद झाल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन पर्याय मार्गावर भर दिला सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन मुद्दलतून बांधकामासाठी किमान २०० कोटी रुपये लागतील असा आराखडा तयार केला आहे यात राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारचा वाटा असेल अशी ही स्पष्ट करण्यात आले होते हा जुना पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे विशेष म्हणजे राजकमल येथे रेल्वे ब्रिज डॉक्टर पंजाबराव उपक्रम भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रयत्नातून निर्माण झाला होता देशाचे पहिले कृषिमंत्री आणि अमरावतीचे तात्काळ खासदार डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी १२ मार्च १९६३ गुरुजी लोकसभेत अमरावती व बडनेरा येथील रेल्वे ब्रिज संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता त्यांनी सदर रेल्वे ब्रिज तातडीने बांधण्या सोबतच अमरावती येथे रेल्वे स्थानक तयार करण्याची ग्रीस संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता त्यांनी सदर रेल्वे ब्रिज तातडीने बांधण्यासोबतच अमरावती येथे रेल्वे स्थानक तयार करण्याची मागणी केली होती बडनेरा रेल्वे पूर अरुंद असल्याने अमरावती शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना किती त्रास होतो याची मांडणी करत अमरावती रेल्वे स्टेशन झाल्याशिवाय इथला विकास होणार नाही असे त्यांनी पटवून दिले होते वीर उत्तमराव मोहिते यांनी भाऊसाहेबांवर लिहिलेल्या ग्रंथात याबाबतचा उल्लेख असल्याची माहिती विद्यापीठातील डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थ नियम केंद्राचे समन्वयक डॉक्टर महेंद्र मोठे यांनी दिले.






