आशाताई बच्छाव
नाशिक जिल्हा परिषदेची एकल महिलांसाठीची संवेदनशील आणि परिवर्तन घडवणारी चळवळ नाशिक,(ॲड विनया नागरे प्रतिनिधी)
नाशिक जिल्हा परिषदेकडून ‘नवचेतना’ या उपक्रमाद्वारे विधवा, घटस्फोटीत आणि परित्यक्ता महिलांच्या आयुष्यात सन्मान, सुरक्षितता आणि स्वावलंबन निर्माण करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले.
नवचेतना अंतर्गत जिल्हा परिषदेने घेतलेले निर्णय —
१) पुनर्विवाहासाठी सुरक्षाकवच – मुलांच्या नावावर ₹1,00,000 ठेव
पुनर्विवाह करणाऱ्या विधवा महिलांच्या मुलांच्या नावावर जिल्हा परिषद स्थिर ठेव उभारणार. नव्या आयुष्याला सुरक्षित आधार मिळावा हा उद्देश.
२) मुलांसाठी सातत्यपूर्ण आधार – ₹2,250 प्रति महिना शिष्यवृत्ती
विद्यमान बालसंगोपन योजनेचा लाभ — मुलांना ₹2,250 प्रतिमहिना शिष्यवृत्ती, शिक्षण आणि संगोपनासाठी ठोस पाठबळ.
३) स्वावलंबनाला चालना – व्याजमाफी
एकल महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील ₹30,000 पर्यंतचे व्याज जिल्हा परिषद भरणार. जवळपास शून्य टक्के व्याजाने स्वावलंबनाची संधी.
४) विवाह मेळावे – सन्माननीय पुनर्वसनाचा मार्ग
प्रत्येक तालुक्यात पुनर्विवाहासाठी विवाह मेळावे आयोजित करणार—सुरक्षित, सन्मानजनक आणि सामाजिक पाठिंबा असलेल्या नव्या सुरुवातीसाठी.
५) गावपातळीवरील ठराव – अमानवी प्रथांना पूर्णविराम
चूड्या फोडणे, कुंकू पुसणे, केस कापणे अशा प्रथा थांबवण्यासाठी ग्रामसभांतून ठराव पारित.
चला तर मग महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी सुरू केलेल्या प्रगत परंपरेला एका नव्या उंचीवर घेऊन जाऊया..






