Home नाशिक कळवाडी जिल्हा परिषद गटातून अभिमन्यू गायकवाड यांचा उमेदवारी करण्याचा ठाम निर्धार 

कळवाडी जिल्हा परिषद गटातून अभिमन्यू गायकवाड यांचा उमेदवारी करण्याचा ठाम निर्धार 

409

आशाताई बच्छाव

1002153759.jpg

कळवाडी जिल्हा परिषद गटातून अभिमन्यू गायकवाड यांचा उमेदवारी करण्याचा ठाम निर्धार
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव : जिल्हा परिषदेच्या कळवाडी गटातून अभिमन्यू काळू गायकवाड हे उमेदवारी करणार असल्याचे निश्चित झाल्याने,गटात नवचैतन्याची लाट उसळली आहे.
मुळचे रोझे ता.मालेगांव येथील रहिवासी असलेले अभिमन्यू काळू गायकवाड हे उच्च शिक्षीत व सुशिक्षित असल्याने त्याशिवाय सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक असल्याने त्यांची उमेदवारी ही निश्चितच विजयश्री खेचून आणेल अशीच चर्चा सध्या तरी कळवाडी गटातून ऐकावयास मिळत आहे.
अभिमन्यू गायकवाड यांच्या पत्नी सौ.सुमनताई गायकवाड या सध्या रोझे गावच्या विद्यमान सरपंच असून, अभिमन्यू काळू गायकवाड यांनी अनेक सामाजिक कार्यात सहभागी होऊन सर्वसामान्य गोरगरीबांच्या हक्कासाठी वेळोवेळी शासनदरबारी पाठपुरावा केला आहे.त्यामुळे त्यांचे कार्य हे कळवाडी गटातील सगळ्यांना अगदी जवळून परिचीत आहे.
अभिमन्यू काळू गायकवाड यांच्या या उमेदवारीस युवा मराठा महासंघ महाराष्ट्र संघटनेने जाहिर पाठींबा दर्शविला असल्याचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्नील बापू देशमुख यांनी सांगितले.