Home नाशिक देवळा तालुक्यातील पुर्व भागातील शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी ६५ कोटींचा...

देवळा तालुक्यातील पुर्व भागातील शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी ६५ कोटींचा निधी मंजूर : आ.डाँ.राहुल आहेर

656

आशाताई बच्छाव

1002225817.jpg

देवळा, भिला आहेर तालुका प्रतिनिधी: देवळा तालुक्याच्या पूर्व भागाचा शेतीसिंचनाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागावा यासाठी चणकापूर उजवा कालव्याअंतर्गत रामेश्वर धरण ते चिंचवे या २६ किमी.पर्यंतच्या रुंदीकरण व अस्तरीकरण करून कालव्याची वहनक्षमता वाढविण्याच्या कामासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन सदर कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार असून यामुळे सुमारे १६ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती आमदार डॉ.राहुल आहेर यांनी शनिवार (ता.२२) रोजी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना आमदार डॉ.आहेर यांनी सांगितले की, हे महत्वाकांक्षी काम पुढील एक वर्षात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या कालव्यासाठी एकूण १८ विमोचक ( गेट) बसविण्यात येणार असल्याने छोटी मोठी पाझर तलाव भरून त्याचा लाभ शेतीला होणार आहे. रामेश्वर ते झाडी या चणकापूर उजवा वाढीव कालव्याची सध्याची वहनक्षमता ८७ क्युसेक इतकीच आहे मात्र या नव्याने प्रस्तावित कामामुळे ती २६५ क्युसेक इतकी होणार आहे. तर झाडी येथील पुच्छ वहनक्षमता जी १३.८० क्युसेक आहे ती आता १०८ क्यूसेस इतकी होणार आहे.
या अगोदर या वाढीव कालव्याला फक्त पूरपाण्याचीच मान्यता होती परंतु आता नारपार योजनेमध्ये समाविष्ट केल्यामुळे सदर कालवा हा आठमाही होऊन शेतीसिंचनासाठी त्याचा उपयोग होणार आहे. यामुळे ११ हजार ५०० हेक्टर क्षेत्र शाश्वत सिंचनाखाली येईल. शेतीपाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याच्या योजनांनाही त्याचा लाभ होणार असल्याने हे काम दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार आहे.
या नंतरच्या दुसऱ्या टप्प्यात चणकापूर ते रामेश्वर या उजव्या कालव्याच्या ३८ किलोमीटरच्या विस्तारीकरणा साठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून याचीही वहनक्षमता वाढवली जाणार आहे. यामुळे या कालव्याची वहनक्षमता १८४ क्युसेकवरून ती वाढवून आता ४२७ क्युसेक करणे प्रस्तावित आहे. तर रामेश्वर धरण येथे टेल ला पूर्वीची ८८ क्युसेक असलेली वनक्षमता २६० होणार आहे. याशिवाय चिंचवे ते झाडी या पुढील साखळी क्र.२७ ते ३६ या कामाचे सर्वेक्षण सुरू आहे. तसेच चणकापूर कालव्याच्या दक्षिण भागाकडील उंचीवर असलेला व मूळ अस्तित्वातील कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहत असलेल्या गावांसाठी रामेश्वर धरण व शेरी येथून उपसा जलसिंचन योजनेचेही काम प्रस्तावित आहे. यामुळे नव्याने तीन हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन यातून वाजगाव, भावडे, रामेश्वर, वडाळे, सुभाषनगर, कापशी, भिलवाड, गुंजाळनगर, वाखारी, दहिवड आदी गावांना त्याचा लाभ होणार आहे. यावेळी माजी जिप सदस्य प्रशांत देवरे हे उपस्थित होते.

Previous articleविद्यार्थांमध्ये रमल्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल राजेगाव शाळेतील विद्यार्थांचा जिल्हाधिकारी यांनी घेतला वर्ग
Next articleYuva-Maratha-23-to-29-Nov-2025-
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.