आशाताई बच्छाव
प्रभाग क्र. 2 भाजपा कडून
हर्षल गेडाम आणि कोमल नैताम यांना उमेदवारी जाहीर; हजारोंच्या उपस्थितीत भव्य शक्तीप्रदर्शनानंतर नामांकन दाखल
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ: प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपाकडून हर्षल गेडाम आणि कोमल नैताम यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली. घोषणा होताच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह उसळला आणि या उत्साहाचे रूपांतर आज हजारोंच्या गर्दीत भव्य-दिव्य शक्तीप्रदर्शनात झाले.
विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, हाती झेंडे घेत, जयघोष करत रॅलीला सुरुवात केली. सुव्यवस्थित आणि उत्साही वातावरणात काढलेल्या या रॅलीने परिसरात मोठे आकर्षण निर्माण केले. रॅलीदरम्यान नागरिकांनीही पुष्पवर्षाव करत उमेदवारांचे स्वागत केले.
शक्तीप्रदर्शनानंतर हर्षल गेडाम आणि कोमल नैताम यांनी समर्थकांच्या उपस्थितीत आपले नामांकन अधिकृतपणे दाखल केले. नामांकन प्रक्रियेच्या वेळी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसला.
उमेदवारांनी समर्थकांचे आभार मानत प्रभागाच्या प्रगतीसाठी बांधिलकी व्यक्त केली. आजचे हे शक्तीप्रदर्शन आणि नामांकन दाखल सोहळा, प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपाचे संघटन आणि जनसमर्थन यांचे प्रत्यंतर देणारा ठरला.






