Home गडचिरोली येवलीत सल्ला गागरा स्तंभ भूमिपूजन सोहळा; हेमंत भाऊ बोरकुटे उपस्थित

येवलीत सल्ला गागरा स्तंभ भूमिपूजन सोहळा; हेमंत भाऊ बोरकुटे उपस्थित

191

आशाताई बच्छाव

1002211126.jpg

येवलीत सल्ला गागरा स्तंभ भूमिपूजन सोहळा; हेमंत भाऊ बोरकुटे उपस्थित

गडचिरोली येवली,सुरज गुंडमवार  ब्युरो चीफ– येवली ग्रामपंचायतमध्ये सल्ला गागरा स्तंभाचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय हेमंत भाऊ बोरकुटे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, गडचिरोली यांनी खास उपस्थित राहून केले.

भूमिपूजन सोहळ्यात भाजपा तालुका महामंत्री मोरेश्वर भांडेकर यांनी देखील विशेष उपस्थिती दर्शवली. मुख्य अतिथी म्हणून श्री युवराज पा. भांडेकर, सरपंच, येवली, उपस्थित होते. यासोबतच किरण ताई चचाने, भाजपा तालुका अध्यक्ष महिला मोर्चा, तसेच प्रकाश गेडाम, ग्रामपंचायत सदस्य, येवली आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात हेमंत भाऊ बोरकुटे यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळा अत्यंत प्रभावी ठरला. त्यांनी ग्रामस्थांसमोर प्रगतीच्या नव्या उपक्रमांची महत्त्वपूर्ण माहिती दिली आणि स्थानिक विकासाच्या दिशेने पुढील पाऊल टाकण्यास प्रोत्साहित केले.

स्थानिक नागरिकांनी हेमंत भाऊ बोरकुटे यांच्या उपस्थितीला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली येवलीच्या विकासासाठी आशावादी अपेक्षा व्यक्त केल्या.