आशाताई बच्छाव
संपादकीय
संजीव भांबोरे भंडारा ब्युरो चीफ
आंबेडकर चळवळीचं काय रे गड्या ?आंबेडकर चळवळीचे काय रे गड्या?
आंबेडकर चळवळीचत फुटीचे राजकारण !जनतेने कुणाचा आसरा घ्यावा!
सध्या महाराष्ट्रात विविध आंबेडकररी संघटना व राजकीय पक्ष असून कोणती संघटना कोणाच्या पक्षाखाली काम करते हेच कळत नाही .तर विविध राजकीय पक्ष असलेले आंबेडकर चळवळीतील पक्ष कोणाच्या दावणीला बांधले आहेत हेच कळत नाही .सर्व आंबेडकरी नेत्यांनी आपापल्या नावाने ही दुकानदारी सुरू केली असून निवडणुकी आली की यांना कोणत्या ना कोणत्या पक्षाशी युती करून आपल्या दुकानदारी सुरू ठेवतात व सौदा करून आपले उमेदवार उभे करतात.अगला राजकीय पक्षाचा पुढारी म्हणेल त्या ठिकाणी उभे ठेवतात. यामुळे आंबेडकरी चळवळ कुठेतरी मागे पडत आहे? दुकानदारीच्या मागे आंबेडकरी जनतेने कुठपर्यंत मागे धावावे हे आपले आंबेडकरी नेते यांना खरं समजत नसेल का! की आपण आपल्या कितीही सामाजिक संघटना व कितीही पक्ष असले तरी येणाऱ्या लोकसभा, विधानसभा ,महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका ,नगरपरिषद पंचायत चुनाव मध्ये एकत्र येऊन ज्या पक्षाचे किंवा सामाजिक संघटनेचे ज्या क्षेत्रात वजन आहे लोकांनी एकत्रित येऊन निवडणुका लढून जागेचं वाटप केलं पाहिजे आणि मताचे विभाजन होत आहे ते एका मतपेटीत कसे येतील याकडे सर्वांनी लक्ष देण्याची काळाची गरज आहे. परंतु आज महाराष्ट्रात स्वतःला आंबेडकरी म्हणणारे नेते गढूळ राजकारण करत आहेत .त्यामुळे आंबेडकरी जनतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहेत. याला कारणीभूत कोण! नेत्यांनी जनतेला दोष देण्यापेक्षा आपणच सुधारणा करावी ?कोण मोठा आणि कोण लहान यात भेद न करता कोणीतरी समोर येऊन या आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करावे? आज आंबेडकरी जनता आपल्या आंबेडकरी विचाराचे नेते केव्हा एकत्र येणार याकरिता चिंतन करत आहेत! परंतु सर्वांनी आपल्या दुकानदाऱ्या सुरू करून यांना कोणत्यातरी विचारसरणीच्या पक्ष्याची युती करून आंबेडकरी जनतेला गुलाम करीत आहेत .ज्या पक्षाचे आमदार ,खासदार आहेत त्या पक्षाचे नेते सुद्धा दुसऱ्या पक्षाची युती करून आपल्याला मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु आपल्याकडे आमदार, खासदार, महापौर ,नगराध्यक्ष काही नसताना आपण सर्व आंबेडकरी गटाचे नेते एकत्र मिळून निवडणुका का लढत नाही ?उलट सर्वच आंबेडकरी पक्षाचे नेते कोणतेही आर्थिक बळ , संघटन नसताना आपल्या पक्षाच्या भरोशावर उमेदवार निवडणुकीत उभे करतात. त्यामुळे मताचे विभाजन मोठ्या प्रमाणात होते व आपला पक्ष कमजोर होते असे या नेत्यांना कळत नसेल का? म्हणजे आंबेडकरी समाजात फुट पाडण्याचे काम नेमके कोण करत आहे! आपले नेते की जनता? म्हणून आंबेडकरी विचाराचे जे पक्ष आहेत त्यांनी एकत्र येऊन निवडणुक लढवावी व मताचे विभाजन टाळावे व एकजुटीने संविधानाचे रक्षण करण्याकरता सर्वांनी एकत्र यावे.






